Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे मतदानाचा अधिकार दिला – प्रा. डॉ. वासुदेव वले

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विचारमंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तहसिलदार कैलास चावडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील, नायब तहसिलदार रणजीत पाटील, प्रतिभा लोहार, जयंत जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. जी. बी. पाटील, आय. क्यु. ए. सी. समन्वयक प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. आर. ठाकरे, प्रा. पी. आर. सोनवणे, भिकन गायकवाड, हिरालाल महाजन, सुधाकर सोनवणे उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले म्हणाले की, साहित्यातील इतिहासाची पाने चाळली तर सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे ? हे लक्षात येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तो अधिकार आपल्याला सहजच मिळवून दिला. म्हणून मतदान प्रक्रिया सुदृढ करण्यासाठी नवतरुणांनी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन केले. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पाचोरा येथील तहसिलदार कैलास चावडे यांनी लोकशाही सक्षम करण्यासाठी नवीन मतदाराने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे. असे आवाहन केले. त्यांनी पुढे विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी होते या संदर्भात देखील मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त “सुदृढ लोकशाहीत मतदारांची भूमिका” या विषयावर निबंध स्पर्धा व ‘मतदार जनजागृती’ या विषयावर रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेसाठी १८ तर रांगोळी स्पर्धेसाठी ९ विद्यार्थी – विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. त्यात निबंध स्पर्धेत प्रथम – छकुली अनिल मिस्तरी, द्वितीय – यातिका उमेश पाटील, तृतीय – दीपिका अरुण पाटील तर रांगोळी स्पर्धेत प्रथम – पोर्णिमा लक्ष्मण पाटील, द्वितीय – नंदिनी धनवीर गुरखा, तृतीय – यातिका उमेश पाटील व उत्तेजनार्थ – सोनी संतोष सोनवणे या विद्यार्थिनींना मिळाला. त्यावेळी कार्यक्रमाला १३० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालय मतदान नोंदणी अधिकारी डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. पी. एम. डोंगरे, प्रा. वाय. बी. पुरी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. आर. बी. वळवी, डॉ. बालाजी पाटील, डॉ. माणिक पाटील, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अतुल पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, डॉ. जितेंद्र सोनवणे, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. सीमा सैंदाणे, प्रा. अधिकराव पाटील, प्रा. इंदिरा लोखंडे, प्रा. अर्चना टेमकर, प्रा. नितीन पाटील, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. शुभम राजपूत, प्रा. रोहित पवार, प्रा. उर्मिला पाटील, बी. जी. पवार, एस. व्ही. तांबे, जे. एस. कुमावत व जी. जे. केरोशिया यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. स्वप्नील भोसले, प्रास्ताविक डॉ. के. एस. इंगळे तर उपस्थितांचे आभार प्रा. नितीन पाटील यांनी मानले.

Exit mobile version