Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.नि. तु. पाटील यांचा सत्कार

भुसावळ : प्रतिनिधी: । भाजप वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि. तु. पाटील यांनी अल्पावधीतच विविध प्रश्नांबाबत प्रशासनाला जाब विचारला आहे उत्तर महाराष्ट्रात वेगळा ठसा उमटवला आहे, काम कौतुकास्पद आहे.असे उद्गार प्रदेश वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ.अजीत गोपछडे यांनी काढले.

भाजपच्या प्रदेश वैद्यकीय आघाडीतर्फे शनिवारी नाशिक मध्ये उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांची बैठक घेण्यात आली.यावेळी डॉ.गोपछडे पुढे म्हणाले की,कोरोना काळात डॉ.नि. तु. पाटील यांनी आशा सेविका,पोलिस यांना हातमोजे वाटप,अन्नदान केले संक्रमित रुग्णांचे वाढदिवस साजरे केले आहेत.आता आघाडीच्या वतीने मोहल्ला क्लिनिक सुरु करून गरिबांना मोफत उपचार देण्यासंबंधी आणि संघटनात्मक चर्चा झाली.

यावेळी डॉ.नि. तु पाटील यांचा सत्कार ” महाराष्ट प्रदेश वैद्यकीय आघाडीचे मुख्य संयोजक डॉ.अजीत गोपछडे यांच्या हस्ते झाला. यावेळी नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ.प्रशांत पाटील, डॉ.भालचंद्र ठाकरे, डॉ.चंद्रशेखर नामपूरकर, डॉ.योगेश पाटील, डॉ.रघुनाथ नामपूरकर ,जळगाव मधील डॉ.नरेंद्र ठाकूर, डॉ.धर्मेंद्र पाटील, तसेच धुळे,नंदुरबार,नाहीक,अहमदनगर येथील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.. सूत्रसंचालन विलास भदाणे यांनी केले.

जिल्हा वैद्यकीय आघाडीचे कार्य हे संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय असे राहील.आगामी काळात प्रत्येक तालुकास्थरावर कार्यकारिणी तयार करून जळगावला वैद्यकीय आघाडीचा मेळावा घेण्यात येईल.वैद्यकीय क्षेत्रांतील प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य होईल असे प्रतिपादन डॉ .नि. तु. पाटील यांनी
सत्काराला उत्तर देताना केले

Exit mobile version