Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. निळकंठ पाटील यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह व शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पाचोरा येथील वृंदावन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. निळकंठ पाटील (एम. एम. बी. बी. एस., आर्थो) यांना वैद्यकीय क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

त्यांचे वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असल्याने त्यांना हा पुरस्कार ३० डिसेंबर २०२२ शुक्रवार रोजी औरंगाबाद येथे मौलाना आजाद रिसर्च सेंटर सभागृहामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे . या पुरस्कारामुळे डॉ. निळकंठ पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Exit mobile version