Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उत्तम प्रतिसाद (व्हिडिओ)

यावल, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज अय्युब पटेल | तालुक्यातील बामणोद येथे डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित नेत्र तपसणी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क तपासणी करण्यात आली. या वेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपेरेशनसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे रवाना केले गेले. इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले गेले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. या शिबिरात एकूण १४५ नेत्र रुग्णांची तपासणी व १८ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रियासाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. नेत्र चिकित्सक डॉ. संजू शुक्ला यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी डॉ. कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना मार्गदर्शन सल्ला दिला. संपूर्ण यावल तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा मानस डॉ.कुंदन फेगडे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र कोल्हे होते. तर कार्यक्रमाचे उद्धघाटन सखाराम आण्णा चौधरी (म्हैसवाडी ) यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यावेळी डॉ.कुंदन फेगडे, डॉ.नरेंद्र कोल्हे, सरपंच राहुल तायडे , उपसरपंच तुषार जावळे, विकास सोसायटी चेअरमन प्रमोद बोरोले, माजी उपसरपंच प्रल्हाद केदारे, पुरुषोत्तम भोळे, देविदास तळेले, गिरीश तळेले, देविदास फेगडे, किसन चौधरी, पवन महाजन, कोमल तळेले, प्रशांत भंगाळे, खेमचंद नेमाडे, मयूर कोल्हे, आरोग्यसेविका रेखा चौधरी, आशा वर्कर गट प्रमुख अर्चना सोनवणे, निलिमा धांडे, आशा वर्कर निलीमा भंगाळे, विमलताई, रेखा झांबरे आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी डॉ.कुंदन फेगडे यांचे संपर्कप्रमुख सागर लोहार, मनोज बारी , विशाल बारी, हर्षवर्धन मोरे आदींनी कामकाज पहिले.

 

Exit mobile version