डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योगा वर्गास प्रारंभ

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॅा. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून १० दिवशीय योगासन वर्गाचा प्रारंभ करण्यात आला.

 

देशपातळीवर प्रसिध्द अशा योगा शिक्षक डॅा. अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॅा. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात  योगासन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या योगासन वर्गाचा समारोप आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी करण्यात येणार आहे. आजच्या या कार्यक्रमास योगा टिचर दिपक पाटील आणि आदित्य दुसाने यांनी विद्यार्थ्यांना योगासने शिकवली. याप्रसंगी गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॅा. उल्हास पाटील, अधिष्ठाता. डॅा.एन. एस. आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्रशासकिय अधिष्ठाता डॅा.जयंत देशमुख, बापुराव बिटे सर, डॅा. विठ्ठल शिंदे, प्रविण कोल्हे, एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी हे हजर होते.

Protected Content