Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात केक कापून बालक दिवस उत्साहात साजरा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | १४ नोव्हेंबर या राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून उपचारार्थ डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल असलेल्या बालकांसाठी केक कटिंगचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांना रंगबेरंगी टोप्या, ड्रॉईंग साहित्य, कॅडबरीचे वाटप करुन बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात. या सर्व वातावरणामुळे बालकांच्या चेहर्‍यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.

 

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग विभागातर्फे सोमवार, १४ नोव्हेंबर रोजी देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्‍त असलेल्या बालदिनानिमित्‍त बालकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पीआयसीयू विभागात फुग्यांची सजावट करण्यात आली असून लहानग्यांना आकर्षण असलेला केक देखील आणला होता. प्रत्येक बाळाला टोपी घालून त्यांच्याहस्ते केक कापण्यात आला. तसेच कॅडबरीचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालकांच्या चेहर्‍यावर हसू फुलले, नातेवाईकांनी देखील उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी बालरोग विभागातील प्रो.डॉ.अनंत बेंडाळे, डॉ.उमाकांत अणेकर, डॉ. सुयोग तन्नीरवार, डॉ. विक्रांत देशमुख, डॉ. धवलकुमार खडके यांच्यासह निवासी डॉ. प्रज्ञिल रांगणेकर, डॉ. सुरुची शुक्‍ला, डॉ. रोहिणी देशमुख, डॉ. दर्शन राठी, डॉ. भारती झोपे, हिरामण धनगर यांच्यासह नर्सिंग स्टाफची उपस्थीती होती. उपस्थीत सर्व मान्यवरांनी बालकांना निरोगी आरोग्याच्या आणि बालदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. या उपक्रमासाठी एमआर तेजस उगले यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version