Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मोफत तपासणी शिबीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक हृदयरोग दिनाचे औचित्य साधून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बालकांवर एएसडी व व्हीएसडी या बिनटाक्याच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे. या शिबीराचे आयोजन गुरूवार २९ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.

अशा शस्त्रक्रियांसाठी उपचार करणारे खान्देशातील एकमेव केंद्र आहे. यासाठी दिल्‍ली येथून तज्ञ असलेले पेडियाट्रिक कार्डियोलॉजिस्ट डॉ.अरविंद सिंग हे येणार आहे.

सर्वप्रथम बालकांची हृदयाची सोनोग्राफी अर्थात टू डी इको तपासणी केली जाणार आहे. याद्वारे ज्यांना जन्म:हृदयाला छिद्र असेल अशा बालकांवर गरजेनुसार एएसडी व व्हीएसडी ही बिनटाक्याची शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड आणणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी रत्नशेखर जैन यांच्याशी ७०३०५७११११, ८००७७०५१३७ किंवा रुग्णालयाच्या ०२५७-२३६६७८८ या क्रमांकावर संपर्क साधून तसेच आजच अर्थात गुरुवार दि.२९ सप्टेंबर रोजी नोंदणी करुन घ्यावी. शुक्रवार दि.३० सप्टेंबर रोजी तज्ञांद्वारे बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली जाणार असून आजच अ‍ॅडमिट होण्याची आवश्यकता आहे. तरी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version