Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातर्फे किनोद येथे आरोग्य शिबीर

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातर्फे किनोद येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा किनोद, यावलकरांनी लाभ घेतला.

 

आरोग्य शिबिरात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील रेसिडेंट डॉ.सुशिल लंगडे, डॉ. वैभव फरके, डॉ. कल्पना देशमुख, इंटर्न सृष्टी जैन, यश अग्रवाल यांनी रुग्णांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेत, योग्य ते मार्गदर्शन केले. १८३ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. यावल येथील समाजसेवक व गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातर्फे यावल शहरातील आरोग्य शिबिरात तब्बल २१० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. येथे मोफत टू डी इको तपासणी, रक्‍तदाब, मधुमेह तपासणीही करण्यात आली याचा रुग्णांनी लाभ घेतला. काही नागरिकांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात येण्याचा सल्‍ला दिला आहे. आगामी काळातही जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मार्केटिंगचे रत्नशेखर जैन, पीआरओ टी.व्ही.पाटील, मकरंद महाजन, विशाल शेजवळ, दिपक पाटील, तुषार सुरे, राहूल तायडे, सचिन बोरोले आदींनी सहकार्य केले.

Exit mobile version