Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला सुरुवात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे यांच्या ओपीडीला डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २८ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला असून दोन शस्त्रक्रियाही झाल्यात. कॅन्सरतज्ञांच्या सेवा येथेच उपलब्ध झाल्याने रुग्णांनीही समाधान व्यक्‍त केले.

 

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात डॉ.अतुल भारंबे यांच्या सेवेला आज गुरुवार दि. १७ फेब्रुवारीपासून पासून सुरुवात झाली आहे. यापुढे दर गुरुवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत त्यांची ओपीडी सुरु असणार आहे. कर्करोगाच्या शस्त्रक्रियांमधील त्यांचा अनुभव दांडगा असून सर्व प्रकारचे कौशल्य वापरुन ते रुग्णसेवा करत असल्याने आज पहिल्याच दिवशी त्यांनी दोन शस्त्रक्रिया केल्यात. यामुळे रुग्णांनी काही लक्षणे जाणवल्यास गुरुवारी रुग्णालयात येवून डॉक्टरांकडून तपासणी करुन घ्यावी, ह्या निशुल्क सेवेचा लाभ घ्यावा आणि विकारमुक्‍त व्हावे.

कर्करोगावर गोदावरीतच उपचार
कर्करोगावर उपचार आता गोदावरीतच उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मुंबई, पुणे जाण्याची आवश्यकता राहणार नाही. परिणामी रुग्णांचा वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होणार आहे. तरी रुग्णांनी कर्करोग ओपीडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या प्रकारच्या कर्करोगावर उपचार
मुखाचा कर्करोग, घशाचा कर्करोग, स्वरपेटीचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, जठराचा कर्करोग, गर्भाशयासह अन्ननलिकेचा, आतड्यांचा, किडनी, मूत्रमार्ग, स्वादुपिंड तसेच पित्ताशयाच्या कर्करोगावर डॉ.भारंबे हे उपचार करतात.

डॉ.अतुल भारंबे यांचा परिचय
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर हे मुळ गाव असलेले डॉ.अतुल गजेंद्र भारंबे यांनी डी वाय पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूर येथून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबई येथील जसलोक हॉस्पीटलमधून डीएनबीची पदवी जनरल सर्जरीतून पूर्ण केली. सुपर स्पेशालिटी आणि कॅन्सर सर्जरीचे शिक्षण भरत कॅन्सर हॉस्पीटल, सुरत येथून प्राप्त केले.

Exit mobile version