डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात स्क्रिझोफ्रेनियाच्या माहितीपत्रकाचे अनावरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील मानसोपचार विभागातर्फे स्क्रिझोफ्रेनिया दिनानिमित्‍त माहितीपत्रकाचे अनावरण करण्यात आले.

 

स्क्रिझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे. परंतु आजही समाजामध्ये या आजाराबद्दल जागरुकता नाही. या उलट समाजामध्ये या आजाराबद्दल खूप गैरसमज आहेत. स्क्रिझोफ्रेनिया या आजाराबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, म्हणून २४ मे रोजी ‘ स्क्रिझोफ्रेनिया दिवस’ साजरा केला जातो. स्क्रिझोफ्रेनिया हा मेंदूच्या संबंधित आजार आहे.  जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगातील २०-२५ लाख लोक स्क्रिझोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त आहेत.

 

सरासरी १०० पैकी १ व्यक्तीला स्क्रिझोफ्रेनिया हा आजार होऊ शकतो.  साधारणपणे १५ ते ५५ वर्षे वयोगटात या आजाराची सुरुवात होते. स्त्री व पुरुष दोघांमध्ये हा आजार समप्रमाणात होतो. स्क्रिझोफ्रेनिया या आजाराचे निदान करण्यासाठी एकही तपासणी उपलब्ध नसली तरी मानसोपचार तज्ञ हे रुग्णांसह नातेवाईकांशी संवाद साधून आजार आहे किंवा नाही याची खात्री करतात.

 

स्क्रिझोफेनिया आजारावर औषधी उपलब्ध असून त्याद्वारे आजार नियंत्रणात आणला जातो. या आजाराचे तज्ञ डॉक्टरांद्वारे मोफत तपासणीची सुविधा डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात उपलब्ध आहे. तसेच जागतिक दर्जाची औषधीही येथे अल्पदरात उपलब्ध असल्यामुळे आतापावेतो अनेक स्क्रिझोफेनियाग्रस्त रुग्णांना योग्य व तात्काळ उपचारामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. झोफेनिया दिनानिमित्‍त माहिती पत्रकाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. तसेच सर्वसामान्यांना हे पत्रक वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख डॉ. मयूर मुठे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी माफक दरात औषधी उपलब्ध करुन दिली त्याबद्दल मानसोपचार विभागाने आभार मानले.

Protected Content