Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात मुबलक ऑक्सीजन उपलब्ध; रुग्णांना प्राणवायुचा सुरळीत होतोयं पुरवठा

 

जळगाव, प्रतिनिधी   ।  रुग्णांना जीवनदान देण्याचं व्रत जोपासत असलेले डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात चोवीस तास अखंडीतपणे ऑक्सीजन पुरवठा सुरु आहे, येथे दोन ऑक्सीजन प्लान्टद्वारे मुबलक ऑक्सीजन साठा उपलब्ध आहे. दर तीन दिवसाआड येथील प्लान्ट हा ऑक्सीजन साठ्याने परिपूर्ण करण्यात येत आहे.

डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात एकही रुग्ण प्राणवायुपासून वंचित राहू नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने आधीच मुबलक प्राणवायु साठ्याची तजबीज करुन ठेवली आहे, सुरवातीला १३ किलो लिटर क्षमतेचा एक ऑक्सीजन प्लान्ट होत, त्यातच काही दिवसांपूर्वी ऑक्सीजनची गरज ओळखून आणखी एक तेवढ्याच क्षमतेचा ऑक्सीजन प्लान्ट कार्यान्वित करण्यात आला, या दोन्ही प्लान्टद्वारे रुग्णालयातील साधारण: ४०० रुग्णांना अविरतपणे प्राणवायु मिळत आहे. नुकताच आज सकाळी ९ टन क्षमतेचा ऑक्सीजन कंटेनरद्वारे ऑक्सीजन प्लान्टमध्ये लोड करण्यात आला.

गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील हे नेहमीच दुरद‍ृष्टीने विचार करत असून ऑक्सीजन प्लान्ट पूर्ण रिकामा होण्याची वाट न पाहता दर तो सतत भरलेला असावा, यासंदर्भात नियोजनाच्या त्यांनी सुचना दिलेल्या आहेत, त्यानुसार दर आठवड्याला सुमारे तीन ते चार वेळेस ऑक्सीजन कंटेनर कोविड रुग्णालयात येत असते. सद्यस्थीतीला डॉ.उल्हास पाटील कोविड हॉस्पीटल वगळता जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरील जवळच्या जिल्ह्यांमध्ये ऑक्सीजनचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे आज मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव खुर्द येथील डॉ.उल्हास पाटील कोविड रुग्णालयात मोठ्ठाले ऑक्सीजन कंटेनर येत असतांना त्याला पाहून धुळे तसेच जळगाव येथे असलेल्या सरकारी यंत्रणा देखील आवाक झाल्यात. रुग्णांसाठी अहोरात्र धडपडणार्‍या या रुग्णालयाचा पारदर्शीपणा या संपूर्ण व्यवस्थेत असल्याने सर्व काही रुग्णसेवेसाठी सुरु असल्याचा प्रत्यय दिसून येत आहे.

Exit mobile version