Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जळगाव, प्रतिनिधी |  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची १९१ वी जयंती राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांची उपस्थिती होती.

 

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान रासेयो स्वयंसेविका वैष्णवी पवार व कृतिका हरणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील काही प्रसंग आपल्या भाषणातून सांगितले. त्यांनतर डॉ. पी. आर. सपकाळे सरांनी स्वयंसेवकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना अभ्यास कसा करावा याबद्दल सुचना दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार स्वयंसेविका कविता पवार हिने मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. कुशल ढाके, प्रा. एन.. डी. पाटील डॉ. ललीत जावळे, डॉ. सागर चव्हाण, प्रा. अजय गव्हांदे, नवल तराडे, संजय सपकाळे, प्रशांत डिक्कर, ऋषिकेश तळोले, गणेश तायडे संदिप पाउलझगडे योगेश सोनोने प्रा. माधुरी कावळे, सुप्रिया पाटील, आश्विनी मोळके,राणी थुटे,सोनिया इंगोले तसेच सोमनाथ चौधरी,भुषण इंगळे,भरत भारंबे व सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

Exit mobile version