Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. आश्विन सोनवणे यांचा उपमहापौरपदाचा राजीनामा (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव महापालिकेत राजकीय घडमोडी घडत आहे. आज डॉ. आश्विन सोनवणे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा महापौर भारतीताई सोनवणे यांच्याकडे दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून केवळ चर्चा असलेल्या उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे हे आपला राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी रात्री राजीनामा देण्याचे आदेश केले होते. त्यानुसार डॉ. सोनवणे यांनी आज उपमहापौरपदाचा राजीनामा दिलाय.

जळगाव महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता आहे. सुरूवातील महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी डॉ. आश्विन सोनवणे यांची वर्णी लागली होती. सीमा भोळे यांनी जानेवारी २०२० महिन्यात राजीनामा दिल्यानंतर त्यानंतर महापौरपदी भारती सोनवणे यांची निवड करण्यात आली. मात्र डॉ. सोनवणे यांनी उपमहापौर पदाचा राजीनामा दिलेला नव्हता. काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने सर्वच निवडणुकांना ब्रेक लावण्यात आला होता. दरम्यान महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी राजेंद्र घुगे पाटील यांची निवड झाल्यानंतर मुदत संपलेल्या सर्वच पदांवर नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसार भाजप नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी डाॅ. साेनवणे यांना उपमहापाैरपदाचा राजीनामा देण्याचे आदेश काढले. या आदेशानुसार डॉ. आश्विन सोनवणे यांनी आज महापौरपदाचा राजीनामा महापौर भारती सोनवणे यांच्याकडे सोपवला आहे.

 

Exit mobile version