डॉ. आंबेडकर सांकृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर मनपाचा निषेध (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  सामाजिक चळवळीचे ऊर्जा केंद्र असलेल्या नागपूर मधील अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रचंड घोषणा देत जोरदार निदर्शने केली.

नागपूर येथील अंबाझरी परिसरात असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र १८ एकर विस्तीर्ण जागेवर आहे. देशभरातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणाऱ्या या केंद्रात सुसज्ज ग्रंथालयासह  भव्य सभागृह होते. मात्र, जातीय विद्वेष मनात बाळगणाऱ्या संघ धार्जिण्या नागपूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपा सरकारने कोणतीही पूर्वसूचना न देता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक केंद्र उध्वस्त केले. यामुळे आंबेडकरी समाजासह‌ सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांच्या अस्मितेला आव्हान देण्यात आले आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्या समन्वयातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन केले. आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले. आंदोलनात भारत ससाणे, रमेश सोनवणे, अमोल कोल्हे,  प्रा. प्रीतीलाल पवार ,भारत सोनवणे,दिलीप सपकाळे, फहीम पटेल,चंदन बिऱ्हाडे,किरण नन्नवरे, सुरेश तायडे,सचिन बिऱ्हाडे,जगदीश सपकाळे,राजू मोरे,अॅड.अभिजीत रंधे,कृष्णा सपकाळे,नाना मगरे,चंद्रकांत नन्नवरे,गौतम सोनवणे,डिंगबर सोनवणे,पितांबर अहिरे,मिलिंद तायडे,शैलेश सपकाळे,खंडू महाले,विश्वास सपकाळे, सुधाकर सपकाळे,संदीप कोळी,पिंटू सपकाळे,संजय बागडे,बापू निकम,संतोष गायकवाड, रवींद्र भालेराव, समाधान सोनवणे,अशोक सोनवणे,नितीन मोरे, बंटी सोनवणे,धर्मेश पालवे,गौतम पानपाटील,दीपक सोनवणे, आकाश सपकाळे,दिलीप त्र्यंबक सपकाळे,सुकदेव जाधव,वासुदेव जाधव नाथ,जितेंद्र साळवे,वाल्मीक सपकाळे,साहेबराव वानखेडे आदि सहभागी झालेत.

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/4588608807926119

Protected Content