Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात रंगला दिवाळी पहाट दीपोत्सव (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात दिवाळी निमित्त दिवाळी पहाट दीपोत्सव हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, आनंदाची उधळण एकोप्याची शिकवण. सूर, ताल व संगीतमय गीतांची गुंफण असलेल्या या कार्यक्रमाने दिवाळी पहाट अधिक आनंदमय झाली. याप्रसंगी आ. हेमा अमळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले. आली दिवाळी…या खास दिवाळीच्या सुमधुर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यासोबत लख लख चंदेरी तेज्याची न्यारी दुनिया, दिवाळी येणार अंगण सजणार, पराधीन आहे जगती ,आनंद पोटात माझ्या मावेना,विठू माऊली तू या गीतांनी कार्यक्रमात रांगत आणली. दीपावलीची माहिती, महत्त्व निवेदनातून मांडण्यात आले. कार्यक्रमाची निर्मिती मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांनी केली, लेखन सविता चौधरी यांनी तर दिग्दर्शन प्रमोद इसे यांनी केले. योगेश जोशी, पूजा साळवी, मीना मोहकर , वंदना सावदेकर यांनी गीत गायन केले तर निवेदन सीमा पाटील, मनीषा पाटील, सविता चौधरी, गजानन कोळी यांनी केले. संगीतसाथ तुषार पुराणिक यांनी केली.

Exit mobile version