Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्त डॉ.सागर गरूड यांचा सत्कार

शेंदूर्णी, प्रतिनिधी| नुकतीच डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ.सागर गरूड यांची नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्याचा शेंदूर्णी येथे सत्कार करण्यात आला.

 

मुंबई येथिल राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी प्रदेश अध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी डॉ.सागर गरूड यांची जळगांव राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र दिले. या नियुक्ती बद्दल डॉ.सागर गरूड यांचे सर्वत्र सत्कार करण्यात येत आहेत. या पास्वभूमीवर  आज शेंदूर्णी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वतीने त्यांचा माजी जि. प.सदस्य सागरमल जैन ,स्नेहदीप गरूड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य संजयदादा गरूड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात दीपक सुरळकर यांची जामनेर तालुका संजय गांधी निराधार समिती सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल माजी पं.स.उपसभापती सुधाकर बारी,पं.स.सदस्य शांताराम गुजर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ.सागर गरूड यांचा साई मित्र परिवारचे वतीने विठ्ठल गरूड,राष्ट्रवादी शेंदूर्णी शहर वतीने अध्यक्ष श्रीराम काटे, योगेश गुजर,धीरज जैन,गजानन धनगर तर लिहा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ.सुनील राठोड,चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी रविंद्र गुजर,विलास अहिरे,अजय निकम,ईश्वर गुजर,गिरीश भावसार,निलेश महाले व संजय सपकाळ आदी उपस्थिती होती.

Exit mobile version