Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांबाबत अफवा पसरवू नका- पोलिसांचा इशारा

चाळीसगाव प्रतिनिधी । डॉक्टर आणि आणि आरोग्य कर्मचारी हे कोरोनाच्या प्रतिकारासाठी अहोरात्र झटत असून त्यांच्या विरोधात कुणी अफवा पसरवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनातर्फे दिलेला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील एका रूग्णालयात उपचार घेतलेला रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला असून त्याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तथापि, शहरात संबंधीत रूग्णालय, त्यातील डॉक्टर आणि कर्मचार्‍यांबाबत अफवा पसरल्या आहेत. तथापि, कोरोनाचा प्रतिकार करणार्‍यासाठी झटणार्‍यांबाबत अशा प्रकारच्या अफवा पसरवणे गैर असून अशांविरोधात कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीसांतर्फे एका निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. डॉक्टर, आरोग्य खात्याचे कर्मचारी, परिचारिका, सफाई कामगार आदींबाबत अफवा पसरवू नये. चाळीसगावात एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसल्याचे यात निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version