Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टर विल्सन फार्मा कंपनीतर्फे गरजूंना मदतीचा हात

चोपडा लतीश जैन । सध्या लॉकडाऊनमुळे अनेकांना अडचणी येत असल्याने अशाच गरजूंना जळगाव येथील डॉक्टर विल्सन फार्मा या कंपनीतर्फे किराणा माल प्रदान करत मदतीचा हात देण्यात आला.

शिंदेदखेडा तालुक्यातील वरूळ (घुसरे) हे दुर्लक्षित गाव!! गाव तसे चांगले पण वेशीवर टांगले अशी एक म्हण आहे तालुक्यातील वरूळ घुसरे या गावाचे तसेच आहे या तालुक्यात अनेक मोठमोठे पुढारी या गावातून निर्माण झाले खरे!! परंतु गावचा विकास झाला नाही. या पार्श्‍वभूमिवर, गावासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे म्हणून मुळगाव वरूळ असलेल्या जैन समाजातील कर्नावट परिवारातील सदस्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनमुळे येथील गरीब कुटुंबांची वाताहत झाली आहे. त्यासाठी कन्हैयालालजी कर्नावट, बाबूलाल कर्नावट, लखीचंद कर्नावट, भुरमल कर्नावट कल्पेश कर्णावट या सर्वांनी गावाचे ऋण फेडावे म्हणून आपल्या जळगावच्या श्री डॉक्टर विल्सन फर्मा या कंपनीच्या माध्यमातून सुमारे १०० गोर गरीब कुटुंबांना एक महिन्याचा पुरेल असा किराणा म्हणून वाटप केला आहे. त्यांच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु येथील कर्नावट परिवार मधील सदस्य भागचंद कर्नावट, राजमल कर्नावट, यांनी त्याहीपुढे जाऊन तालुक्यात जैन संघटनेतर्फे सुरू असणार्‍या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत या योजनेत मोठा हातभार लावत सुमारे ५० हजार रुपयांचे मेडिसिन आपल्या विल्सन फर्मा जळगाव स्थित कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहे.

वरुळ घुसरे या गावात तशी दरवर्षी पाणीटंचाई या गावाच्या पाचवीलाच पुजलेली त्यामुळे गेल्या वर्षी देखील भीषण पाणीटंचाई असताना या कर्नावट परिवाराचे भागचंद कर्नावट यांनी गुरांसाठी स्वखर्चाने टँकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली होती हे आजही ग्रामस्थ विसरलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आज कोरोना या महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वत्र गावे गाव बंद असताना सुमारे शंभर कुटुंबांना किराणा किटचे वाटप केल्याने ग्रामस्थांनी कर्नावट परिवाराचे मनोमन आभार मानले आहेत. या किट वाटप प्रसंगी गावचे उपसरपंच राकेश गिरासे, भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक चंद्रकांत डागा, पत्रकार विनायक पवार, माजी सरपंच शिवदास माळी, प्रकाश पाटील, विलास माळी, भटू धनगर, प्रवीण मराठे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्यात आले.

Exit mobile version