Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डॉक्टर्सला त्यांच्या रूग्णालयातच क्वॉरंटाईनची परवानगी देण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । कोरोना बाधीताच्या संपर्कात आल्याचे दिसून आल्यास डॉक्टर्सला त्यांच्या रूग्णालयातच क्वॉरंटाईन करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी यावल डॉक्टर असोसिएशनने एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

यावल येथील यावल डॉक्टर असोशिएसनच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या मागणीच्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही डॉक्टर, मदतनिस आम्ही सर्वतोपरीने या देशव्यापी विषाणुशी समर्थपणे लढा देत आहोत. दरम्यान या प्रसंगात कोरोना संयशीत किंवा कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या सहवासात आल्यास आम्हास ही क्वारंटाईन करण्यात यावे तथापि, यासाठी निकष बदलण्याची अपेक्षा आहे. डॉक्टर हे नेहमीच आपल्या यावल व परिसरातील नागरीकांच्या आरोग्य सेवेसाठी दक्ष व कार्यतत्पर असतात व आहेत मागील दोन महीन्यापासुन सध्या आपल्या देशात आलेल्या आपातकालीन परिस्थितीत सुद्धा शासनाच्या नियमांचे व सुचनांचे पालन करून आम्ही आमच्या निर्धारीत वेळेत आपली आरोग्य सेवा बजावत आहे ही आरोग्य सेवा देतांना जर आमच्या संपर्कात कोवीड१९चा रुग्ण किंवा कोरोना संयशीत आल्यास आम्हाला व आमच्या सोबत मदतनिस व्याक्तिस क्वारंटाईन करतांना प्रशासकीय ईमारतीत ठेवु नये. असा प्रसंग आलाच तर आम्ही स्वतः हाच क्वारंटाईन करून घेवू. असे असेल तरच आम्ही आमची आरोग्य सेवा क्लिनिक / हॉस्पीटल सुरू ठेवणार असुन याबाबत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी केली यात करण्यात आली आहे. हे निवेदन यावल तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार यांना निवेदन दिले असुन या निवेदनावर डॉ. मनोज वारके, डॉ. तुषार फेगडे यांच्यासह डॉक्टर असोशिएसनच्या सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Exit mobile version