Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डेडीकेटेड हेल्थ सेंटर ( हॉस्पिटल) चे लोकार्पण

 

 

 

 

 जळगाव : प्रतिनिधी । कोविड केअर युनिट व जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात कोरोना उपचारांसाठी हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे

 

कोविड केअर युनिट व जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरीच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, एम जे कॉलेज समोर ,जळगाव येथे २५ बेड च्या डेडिकेटेड हेल्थ सेंटरच्या हॉस्पिटलचे जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी व जळगाव शहरचे काझी अतिकउर रहेमान यांच्या शुभ हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम पर्सनल ला बोर्डचे संचालक हाजी गफ्फार मलिक होते.

 

यावेळी सेंटरचे मुख्य समन्वयक फारुक शेख , मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रियाज गुलाब बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एजाज शेख व डॉ मोहसीन शेख  सह मनपा डॉ विजय घोलप   उपस्थित होते.

 

शासनाने ठरविलेल्या दरा पेक्षा कमी दरात  कोरोना उपचार करणारे हे रुग्णालय या संघटनेने सुरू केले  याचा फायदा सर्व समाजाला होईल अशा प्रकारचे कार्ये करण्यास पुढे यावे असे वक्त्यव्य आयुक्त कुलकर्णी यांनी केले.

 

मुफ्ती अतिक यांनी कुराण पठण करून या  वेळी सर्व मानवतेने एकत्रित होऊन ईश्वराला नतमस्तक होऊन यातून सुटकेसाठी प्रयत्न करावे व  गरिबांना मदत करावी असे आवाहन केले.

गफ्फार मलिक यांनी गरीब रुग्णांना मलीक फाउंडेशनतर्फे आवश्यक ती मदत करण्याचे घोषित केले

 

शासनाने ठरवलेल्या दरापेक्षासुद्धा अत्यंत कमी दरात ना नफा ना तोटा या तत्त्वावर हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून याचा लाभ गरीब रुग्णांनी घ्यावा असे  आवाहन  हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी केले आहे.

Exit mobile version