Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डी-मार्ट ते इच्छादेवी चौक दरम्यानचा रस्ता दुरुस्ती करावा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील डी-मार्ट ते इच्छादेवी चौक दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्ता तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन मंगळवारी २३ ऑगस्ट रोजी रिपाइंच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांना देण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील इच्छादेवी चौक ते डी-मार्ट पर्यंतचा रस्ता हा गेल्या अनेक महिन्यांपासून खराब झाला आहे. हा रस्ता दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी अनेक वेळा महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या अडमुठेपणामुळे रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे लहान मोठे अपघात होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने खासदार उन्मेश पाटील यांना निवेदन देवून रस्त्याच्या कामाची दखल घेत लवकरात लवकर कामाला सुरूवात करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, अक्षय मेघे, असिफ शाह बापू,नाना फुलपगारे, जमील शेख आदी उपस्थित होते.

Exit mobile version