डिझेल दरवाढीमुळे शेतमशागत खर्चात वाढ

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यात ग्रामीण भागात खरीप पूर्व मशागतीचे काम बऱ्याच ठिकाणी सुरु झाले आहे. परंतु या वर्षी डिझेलचे दर कमालीचे वाढल्याने शेतमशागतीच्या खर्चात जवळपास ३० ते ३५ टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी काळात कृषी खर्चात होणारी वाढ शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमध्ये वाढ करणारी ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

कृषी क्षेत्रात गेल्या १०/१२ वर्षात अनेक तांत्रिक बदल झाले असून बहुतांश शेतकरी पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणावर भर देत आहेत. नांगरणीसह अन्य कामे पारंपारिक बैलजोडीच्या माध्यमाऐवजी यंत्रांमुळे कमी वेळात सोपी होतात असे वाटत होते. परंतु डिझेलचे दर वाढल्याने शेतमशागतीचे खर्चात देखील वाढ होत आहे. नांगरणी, कोळपणी, रोटावेटरसह रब्बी हंगामात गहू काढणीच्या रोटावेटरचा एकरी खर्च १ हजार ५०० रुपयांवरून २२०० ते २८०० रुपये पर्यंत आहे. तर नांगरणीचा एकरी खर्च तीन चार वर्षापूर्वी १००० ते १२०० होता त्यात आता दुपटीने वाढ झाली असून दोन ते अडीच हजार
रुपयेपर्यंत वाढला आहे. याचा एकत्रित परिणाम अर्थात नजीकच्या काळात शेती उत्पादनांच्या किमती वाढण्याची देखील शक्यता आहे. तसेच मशागतीचा खर्चासोबतच रासायनिक खतांच्या किमती, वाहतूक याचा विचार करता आगामी खरीप हंगामात ३० ते ३५ टक्के खर्च वाढू शकतो. याचा मोठा परिणाम शेतमालाच्या किमतीवर होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.

डिझेलचा दर १०५ रुपयांपर्यंत गेल्यानंतर पेरणीपूर्व मशागत कामांसाठी लागणाऱ्या भाडय़ाने मिळणाऱ्या यंत्रांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. पूर्वी रोटावेटरचा एकरी दर एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपयांनी वाढला असून रोटावेटरच्या तुलनेने नांगरणीसाठी अधिक डिझेल लागते. त्यामुळे सर्वच कामांचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे.
सुधाकर पाटील, शिरसोली.

Protected Content