Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डांभूर्णी हत्याप्रकरण : संतप्त जमावाकडून ग्रामपंचायतीत तोडफोड; पोलीसात तक्रार

यावल प्रतिनिधी । अल्पवयीन मुलाची हत्या झाल्यानंतर गावातील संतप्त जमावाने ग्रामपंचायतीत तोडफोड करून दोन लाखांचे नुकसान केले. ग्रामसेवक सुनिल गोसावी यांनी तोडफोड करणाऱ्या व ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात ५० ते ६० जणांच्या जमावाविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील दहावीत शिकणारा १६ वर्षीय मुलगा कैलास चंद्रकांत कोळी याचा मृतदेह डांभूर्णी शेतशिवारात शुक्रवारी दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास आढळून आला होता. डोळ्यांमध्ये काड्या खुपसून आणि डोक्यात दगड आणि विटांनी मारहाण करून जबर जखमी केले होते. कैलासचा मृतदेह हा गावातील दत्तात्रय माणिकराव पाटील यांच्या शेतात आढळून आला होता. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान रात्री उशीरापर्यंत यावल पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड
अल्पवयीन मुलाची हत्या केल्यानंतर गावात तणावाचे वातावरण झाले होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतीचे कार्यालयाचा दरवाजा तोडून आत शिरत तोडफोड केली व साहित्यांची नासधूस केली. यात ऑनलाईन मशीन बॉक्स, लोखंडी टेबल, ट्यूब लाईट, ११ खुर्च्या, लाकडी कपाट, टीसीएल पावडर, कॉम्प्यूटर, टेबल संच, दप्तर अस्तवस्त केले, प्रिंटर्स, स्कॅनर्स, सिंलींग फॅन, पंखा असे एकुण १ लाख ७७ हजार रूपयांचे नुकसान केले आहे.

गावातील सरपंच व पोलीस पाटलांवर ग्रामस्थांचा रोष
संशयित आरोपी यश पाटील याने यापुर्वी देखील असाचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र काल घडलेल्या हत्याप्रकरणामागे संशयित आरोपीचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज होता. घटना घडल्यानंतर डांभुर्णीकरांनी सरपंच गुरूजित चौधरी आणि गावातील पोलीस पाटील यांच्यावर रोष व्यक्‍त केला. मात्र संशयित आरोपी हा मनोरूग्ण असल्याचे सांगण्यात येत होते त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. दरम्यान काल सायंकाळी सामानाची नुकसान केल्याप्रकरणी ग्रामसेवक सुनिल गोसावी यांनी तोडफोड करणाऱ्या व ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात ५० ते ६० जणांच्या जमावाविरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version