Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डांभुर्णी येथे स्वयंदिप प्रतिष्ठानतर्फे विविध योजनांबाबत प्रशिक्षण

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी येथे स्वयंदीप प्रतिष्ठान संचलित शासकीय योजनांची माहिती व मदत समितीची पहिली बैठक तसेच प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिराचे पाहिले सत्र दिनांक रविवार ३१ जानेवारी रोजी स्वयंदीप अभ्यासिका मार्गदर्शन उपक्रम  घेण्यात आला.

समितीमध्ये डांभुर्णी गावातील प्रभाग निहाय सुशिक्षित युवक व युवतींचा समावेश आहे तसेच त्यांच्यात एमएसडब्ल्यू झालेल्या तरुणांचा देखील समावेश आहे. ही समिती स्थापनेमागचा उद्देश म्हणजे या समितीतील सर्व सदस्यांचा विकास झालाच पाहिजे सोबत यांच्या प्रयत्नातून गावातील योग्य लाभार्थींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा. स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील यांनी प्रस्तावना केली.

ह्या शिबिरासाठी प्रशासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते. जळगाव कामगार कल्याण केंद्र संचालक मिलिंद पाटील, मानव संसाधन विकास तज्ञ डॉ. हर्षल कुलकर्णी , साईधन इंटरप्राईजेस अध्यक्ष आणि दिनवार्ता साप्ताहिक चे मुख्य संपादक धनंजय कीर्तने आणि चंद्रशेखर सोळंके तसेच शैक्षणिक औद्योगिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

समग्र गावाचा विकास हा गावातील युवक व युवतीच्या माध्यमातुन विकास मार्गाचा पाठलाग करणे हे अवघड नाही हे आज मान्यवरांच्या मार्गदर्शनाने जाणीव करून दिली. कार्यक्रमात विविध योजनांची सविस्तर माहिती समितीच्या सदस्यांना देण्यात आली. महाराष्ट्र कामगार कल्याण कायदा १९५३ मध्ये मोडणारे सर्व कामगार(अपवाद शासकीय कामगार), गंभीर आजार सहायता योजना, बांधकाम कामगार कल्याण योजना, फ्रेंच भाषा कोर्स, इंग्लिश स्पीकिंग कोर्स, व उद्योग उभारणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version