डांभुर्णी येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ

 

यावल  : प्रतिनिधी ।  तालुक्यातील डांभुर्णी येथील आरोग्य उप केंद्रात आज यावल  पंचायत समितीच्या सभापती पल्लवी चौधरी यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला

 

देशभरात एक वर्षापासुन थैमान घातलेल्या कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी द्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत  शासनाच्यावतीने संपूर्ण राज्यासह देशात कोवीड१९ लसीकरणालाही मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे.

 

किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत  डांभुर्णीतील आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी डाँ.मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे शुभारंभ यावल पंचायत समितीच्या सभापती सौ.पल्लवी चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डांभुर्णीच्या सरपंच सौ.कविता  कोळी , सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व डांभुर्णीचे  उपसरपंच पुरूजीत  चौधरी, माजी उपसरपंच समाधान कोळी, कृषी उत्पंन्न बाजार समीतीचे माजी संचालक दिनकर  पाटील,चेतन सरोदे, वैद्यकीय अधिकारी डाँ. अमोल पाटील , समुदाय आरोग्य आधीकारी डाँ.सोनल भंगाळे , आरोग्य सहाय्यीका उषा पाटील , आरोग्य सेवीका मंगला सोनवणे , आरोग्य सेवक जिवन सोनवणे, दिपक तायडे, आशा गट प्रवर्तक प्रतिभा सोनवणे, आशा  स्वयंसेविका  रेखा कोळी, पुनम सनेर आदी प्रामुख्याने  उपस्थित  होते.

 

Protected Content