यावल (प्रतिनिधी)- तालुक्यातील डांभुर्णी येथे आज मध्यरात्रीच्या सुमारास एका वयोवृद्ध आदीवासी व्यक्तिने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 30 जानेवारी 2020 रोजीच्या मध्यरात्री तालुक्यातील डांभुर्णी येथील रहीवासी रामदास मंजी बारेला वय -६५ वर्ष यांनी आपल्या राहत्या घराच्या छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडीस आला. रामसिंग बारेला यांच्या खबरीवरुन यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत रामदास बारेला यांच्या पश्चात पत्नी व नात असा परीवार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ते सतत आजारी राहत होते या नैराश्येतून त्यांनी अत्महत्या केल्याचे परीसरातून बोलले जात आहे.