डांभुर्णी जिल्हा परिषद मराठी शाळा विकास कामंं – नेमके श्रेय कोणाचे ? (व्हिडीओ )

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज अय्युब पटेल | तालुक्यातील डांभुर्णी प्राथमिक शाळेच्या सुधारणेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्याचा सत्कार स्वयंदीप प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आला होता. मात्र, श्रेय वादातून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून याबाबत प्रतिष्ठानचे संदीप पाटील अधिक माहिती देत आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली.

 

संदीप पाटील यांनी उपस्थित केले ९ प्रश्न पुढील प्रमाणे, ग्रामपंचायत डांभुर्णीशी संबंधित सरपंच, ग्रामसेवक व शाळेचे मुख्याध्यापक यांना मौखिक व लेखी स्वरूपात सत्कार समारंभाचे माहिती मी स्वतः तसेच लेखी निवेदन डांभुर्णी ग्रामपंचायत सदस्य शुभम विसवे यांनी दिलेली आहे. त्याची पोचपावती देखील आमच्याकडे आहे, मुख्याध्यापकांवर दबाव आणून चुकीच्या आशयाचे पत्र देण्याचे व त्या माध्यमातून कार्यक्रम होऊ नये यासाठी दडपशाहीचे धोरण वापरण्याचे काय कारण काय?

शिवजयंतीच्या आयोजनात खोडा

स्वयंदीप प्रतिष्ठानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण कार्यक्रमात अडचण निर्माण करण्यात आली. शिवजयंती व्याख्यानमालेच्या दरम्यान भास्करराव पेरे पाटील यांनी गावात येऊ नये यासाठी खोडा घालण्यात आला होता.

डांभुर्णी प्राथमिक शाळेच्या सुधारणेसाठी लोकसहभागातून स्वयंदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून निधी मिळालेला आहे. जिल्हा परिषद माजी सदस्य आर. जी. पाटील यांनी शाळेला पत्रे दिली आहेत. संरक्षण भिंतीसाठी स्वयंदीपच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून आणि तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या विशेष सहकार्याने दहा लाख रुपये मिळाले आहेत. तसेच प्राथमिक शाळा डिजिटल करणेकामी अँड्रॉइड टीव्ही देखील स्वयंदीप प्रतिष्ठानने दिला आहे मग ही जी सुधारणा झाली त्यात ग्रामपंचायतीने नेमके कोणते कार्य केलं? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

म्हणजे जर सर्व कामे जर लोकसहभाग तसेच जिल्हा परिषद सदस्य ,जिल्हा नियोजन समिती, पंचायत समिती यांच्या माध्यमातून झाली तर मग आराखड्यात मंजूर साडेसात लाख शैक्षणिक विकास निधी ग्रामपंचायत ने कुठे व कसा खर्च केला? संरक्षण भिंत संपूर्ण शाळेला पाहिजे त्यासाठीच जिल्हा नियोजन समितीमधून दहा लाख रूपये मिळाले होते मग फक्त दर्शनी भागातच भिंत बाकी बाजूला तारेचे कुंपण असे का करण्यात आले आणि बाकी निधी कुठे वळवला?

स्वयंदीप प्रतिष्ठानने लोकसहभागातून निधी जमवला. तो तत्कालीन सरपंच यांनी स्वयंदीपच्या खात्यावर टाकण्यास नकार देऊन ,परस्पर स्वतःच्या वैयक्तिक खात्यावर टाकला. त्याचा लेखाजोखा ही कुठेच का प्रसिद्ध करण्यात आला नाही ?  हा लेखाजोखा वारंवार मागून अजूनही दिलेला नाही असे का?

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रसार माध्यमे यांना खोटी माहिती देऊन शासन, प्रसारमाध्यमे व ग्रामस्थ यांची दिशाभूल का केली जाते आहे? असं नसतं तर जिल्हा परिषदेचे मा.सदस्य आर.जी.पाटील यांनी स्वतः शाळेत येऊन संबंधितांची कानउघडणी का केली असती?

शाळा सुधारणेत  संजय दत्तात्रय सोनवणे यांनी स्वतः पाहणी केली व तांत्रिक व पायाभूत सुधारणा कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. एवढेच नव्हे तर या कामासाठी योग्य व अनुभवी कंत्राटदार देखील उपलब्ध करून दिला. परंतु तत्कालीन सरपंच यांनी परस्पर या कंत्राटदार बदलून दुसरा कंत्राटदाराला हे काम का दिले?

प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक विकासासंदर्भात जो काही निधी लोकसहभागाचा असेल किंवा शासकीय आशा सर्व बाबींच विनियोजन, खर्च मंजुरी, प्रत्यक्षात खर्च करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे. मग तत्कालीन सरपंचानी तो स्वतःच्या वैयक्तिक खात्यात कसा वळवला. संबंधित व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणजे मुख्याध्यापकांना या बाबतीत कुठलीही कल्पना नाही किंवा त्यांच्याकडे लेखी स्वरूपात कुठलाच दस्तऐवज का नाही ? तसेच समितीच्या स्थापनेतही अनियमितता दिसते या बाबतीतही चौकशी व्हावी. शाळेच्या सुधारणा कार्यात योगदान दिलेल्याचा सत्कार करणे यात सहभागी होण्या ऐवजी याला षडयंत्र म्हणणे या कार्यक्रमाचा अपप्रचार करणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल ही स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील यांनी उपस्थित केला आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/392096049005304

 

Protected Content