Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

डंपरच्या धडकेत दोन तरुणांचा मृत्यू; पोलिसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । भरधाव डंपरने धडकेत दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाच्या भैरवनाथ मंदिराजवळ ही घटना घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद शाकीर अली जाकीर अली (वय २८) आणि शमीम शाह (वय २६) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. हे दोघेही मुळचे प्रदेशातील रहिवासी होते. पीओपीचे बांधकाम कामगार असलेले मोहम्मद अली व शमीम शाह हे दोघेजण दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास कामानिमित्त कजगाव येथे निघाले होते. कजगाव येथे जात असताना भडगाव रस्त्यावर वाघळी गावालगतच्या भैरवनाथ मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिली. यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचा चालक पसार झाला. याप्रकरणी डंपर चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version