Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ठाकरेंच्या आयुष्यात राऊत व सरदेसाई हे शकुनी : नितेश राणे

सिंधुदुर्ग-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी जसा उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

आमदार नितेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे पिता-पुत्रासह संजय राऊत यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले की, वरूण सरदेसाईमुळे आदित्य ठाकरेच्या जवळ कोणी उरलेलं नाही. कोविड घोटाळ्यात वरून सरदेसाईचं नाव येऊ शकतं. त्या घोटाळ्यात आघाडीत वरूण सरदेसाई होता. सरदेसाईला आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंची जशी अवस्था झाली तशी अवस्था आदित्य ठाकरेची होईल.

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचं काम संजय राऊत आणि सरदेसाई करत आहेत. २०१९ ला बाळासाहेबांचे विचार विकून कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झालं होतं. ५० योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला, असं नितेश राणे म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत याने महिला अत्याचारावर बोलणं आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करन हा सर्वात मोठा जोक आहे. उद्या शक्ती कपूर ने कॉलेज मध्ये जाऊन लेक्चर देण्यासारखा विषय असल्याची टिका देखील नितेश राणे यांनी केली.

Exit mobile version