ठाकरेंची याचिका कोर्टाने फेटाळली; धनुष्यबाण मिळण्याची शक्यता धुसर

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आल्याने आता त्यांच्या पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणे जवळपास अशक्य झाल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे गट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी शिवसेना या नावावर व धनुष्य-बाण या निवडणूक चिन्हावर दावा केला होता. दोन्ही गटांनी सादर केलेल्या लेखी निवेदन व पुराव्याच्या आधारे केंद्रीय निवडणूक आयोगाने ८ ऑक्टोबर रोजी पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी निर्णय घेतला. या हंगामी निर्णयाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले होते.

या अनुषंगाने उध्दव ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पक्षनाव व निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेत आव्हान दिलं होतं. मात्र दिल्ली हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. तसंच निवडणूक आयोगाला यासंबंधी तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय निवडणूक आयोगाच्या अधिकारकक्षेत असल्याचंही कोर्टाने स्पष्ट केले. यामुळे आता धनुष्यबाण हे चिन्ह उध्दव ठाकरे यांना मिळण्याचा मार्ग अजून धुसर झाला आहे.

Protected Content