Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रक चालकासह क्लीनरला मारहाण : एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर गावाजवळ ट्रकने जाणाऱ्या चालकासह क्लिनरला विटनेर गावातील चौघांनी काहीही कारण नसतांना बेदम मारहाण केल्याची घटना ३० जानेवारी रोजी दुपारी घडली. तरूणाच्या फिर्यादीवरून चौघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शेख हसीम शेख इसाक (वय-२३) रा.मित्तल नगर चोपडा हे ट्रकवर क्लिनरचे काम करतात. त्यांच्या सोबत चालक शेख जमील यांच्यासोबत ट्रकने वावडदा गावाकडून नेरीकडे जात असतांना विटनेर गावाजवळ काहीही कारण नसतांना विटनेर गावातील मुकुंदा रामकृष्ण मोरे रा. शिरसोली, मनोज अरूण सपकाळे रा. जैनाबाद जळगाव, हेमंत दगडू देवरे रा. दिनकर नगर जळगाव आणि सोपान रमेश वराडे रा. विटनेर यांनी त्यांचे वाहन आडविले. चालका शेख जमील आणि क्लिनर शेख हसीम या दोघांना गाडीतून बाहेर ओढून काहीही एक न सांगता बेदम मारहाण करण्यास केली. शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी क्लिनर शेख हसीम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शशीकांत पाटील करीत आहे.

Exit mobile version