Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टोलच्या बेकायदेशीर वसुली विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन!

चाळीसगांव, प्रतिनिधी| शहराजवळील बायपासच्या टोल नाक्यावर अवजड वाहनांकडून बेकायदेशीरपणे वसुली करण्यात येत आहेत. याविरोधात राष्ट्रवादी पक्षांकडून आज आंदोलन करण्यात आले. तसेच हे तात्काळ थांबविण्याबाबत निवेदन देण्यात आले.

याबाबत वृत्त असे की, कन्नड घाटात गेल्या काही दिवसांपूर्वी दरड कोसळल्याने या मार्गाने ये-जा करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. पर्यायाने खडकी ब्रु. बायपास रोडने नांदगाव मार्गाने वाहणे सुरू आहेत. मात्र शहरापासून जवळ असलेल्या बायपास वरील टोल नाक्यावर अवजड वाहनांकडून बेकायदेशीरपणे वसुली करण्यात येत आहेत. हि गंभीर स्वरूपाची बाब उघडकीला आली आहे. हे लक्षात येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून सदर टोल नाक्यावर शनिवार रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास आंदोलन छेडण्यात आले. यावेळी टोल नाका बंद झालेच पाहिजे अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. दरम्यान बायपासला रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. यामुळे अनेक छोटे-मोठे अपघात होत असतात. तरीही हा टोल नाका बेकायदेशीर सुरूच आहे. यामुळे तातडीने टोल नाका बंद करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. सदर आंदोलन हे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शाम देशमुख, युवक तालुकाध्यक्ष मोहित भोसले व मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्त्यांसह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version