टोकियोमध्ये २ आठवड्यांची आणीबाणी ; प्रेक्षकांविना ऑलिम्पिक स्पर्धा?

 

 

टोकियो : वृत्तसंस्था । तज्ञांशी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी  जपानमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर आता टोकियोमध्ये दोन आठवड्यांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

 

जपानची राजधानी टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात होणार आहेत. पण टोकियोमध्ये वाढत्या कोरोना संकटामुळे जपानी सरकार आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या संख्येचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला

 

गेल्या वर्षी कोरोनामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. ऑलिम्पिक स्पर्धावरील कोरोना संकट लक्षात घेता जपान सरकार आणखी काही कठोर निर्णय घेऊ शकते. खेळांच्या दरम्यान परदेशी प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार नाही.

 

यापूर्वी, टोकियोमधील नागरिकांना मैदानात जाऊन ऑलिम्पिक खेळ पाहणे शक्य आहे का हे तपासले जात होते. पण दोन आठवड्यांच्या आणीबाणीमुळे स्थानिक प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यताही दूर झाली आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी कोरोना विषाणूचा वाढत्या कहर लक्षात घेऊन टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता आणीबाणीच्या परिस्थितीत ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले जाईल. त्यामुळे आता ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

टोकियोमध्ये कोरोना संदर्भात खूप कठोर प्रोटोकॉल लागू करण्यात आलेले नाही. बार आणि रेस्टॉरंट्सचे तास कमी करुनही  संसर्ग थांबलेला नाही. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख गुरुवारी टोकियो येथे दाखल होणार आहेत. पण ते तीन दिवस टोकियोच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन राहणार आहेत.

 

 

 

नैराश्य आणि चिंतेशी झगडत असल्यामुळे चर्चेत राहिलेली जपानची नामांकित टेनिसपटू नाओमी ओसाकाने सोमवारी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. याचप्रमाणे पत्रकार परिषदांनाही सामोरी जाऊ शकेन, असा विश्वास व्यक्त केला आहे. विम्बल्डन आणि फ्रेंच स्पध्रेतून माघार घेणाऱ्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील ओसाकाने घरच्या मैदानावरील ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले.

 

Protected Content