टेन्ट हाऊस व्यावसायिकाची चारचाकी वाहनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारातील खोटे नगरातून टेन्ट हाऊस व्यावसायिकाची ७० हजार रूपये किंमतीची बोलेरो कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवारी ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सतिष मोहन भोई (वय-३८) रा. निमखेडी शिवार, खोटे नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. टेन्ट हाऊसचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो. या कामासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ बीएस ०१३१) क्रमांकाची बोलेरो चार चाकी वाहन आहे. ४ मार्च रोजी रात्री ९ वाजता चारचाकी वाहन हे घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रूपये किंमतीची चार चाकी वाहन चोरून नेले. हार प्रकार रविवारी ५ मार्च रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आला. त्यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला, परंतू वाहन कुठेही मिळाले नाही. अखेर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ५ मार्च रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र पाटील करीत आहे.

Protected Content