Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टेंपो ट्रॅव्हलरला टिप्परची धडक: ११ जण ठार

धारवाड वृत्तसंस्था । येथून जवळच असलेल्या इटगट्टी गावाजवळ टेंपो ट्रॅव्हलरला टिप्परने दिलेल्या धडकेत ११ जण ठार झाले असून यात दहा महिलांचा समावेश आहे.

महिला मकरसंक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी गोव्याच्या दौर्‍यावर निघाल्या होत्या. देवनगरेतील महिलांच्या क्लबच्या त्या सदस्या होत्या. गोव्याला पोहोचण्यापूर्वी धारवाडजवळच भीषण अपघातात दहा जणींना प्राण गमवावे लागले. धारवाड ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक महेंद्रकुमार यांच्या उपस्थितीत टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये अडकलेले दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

धारवाड जिल्ह्यातील इत्तीगट्टी तालुक्यातील महामार्गावर हा अपघात झाला. धारवाड ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. अपघातात पाच महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर दोघी जणींना किरकोळ दुखापत झाली आहे.

Exit mobile version