Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टी – २० मध्ये भारतीय फलंदाजाचं केवळ १७ चेंडूत शतक !

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आज मेघालय आणि मिझोरम यांच्यातील सामन्यात मेघालय संघाचा कर्णधार पुनीत बिष्ट याने ५१ बॉलमध्ये तडाखेबाज १४६ धावा ठोकल्या. यामध्ये १७ षटकारांनी दिलेल्या १०२ धावांचा समावेश आहे

. याअगोदर क्रिकेटमध्ये असं कधीच झालं नाही की बॅट्समनने १७ चेंडूत १०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

पुनीत बिष्टने खेळलेल्या १४६ धावांच्या खेळीत १०२ धावा फक्त षटकारांनी केल्या त्याने ६ चौकारही लगावले. म्हणजेच त्याने २३ बॉलमध्ये १२६ रन्स ठोकले. विकेटकीपर बॅट्समन असलेल्या पुनीतने क्रमांका चारवर येऊन २८६ . २७ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली.

पुनीत बिष्टच्या या वादळी खेळीने पहिली बॅटिंग करणाऱ्या मेघालयने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 230 रन्स केले. पुनीतशिवाय मेघालय संघाचा सलामीवीर योगेश तिवारीने ४७ बॉलमध्ये ५३ रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीला त्याने ६ चौकार आणि २ षटकारांचा साज चढवला.

मिझोरमचा बोलर कोहलीला पुनीत बिष्टच्या वादळाचा सामना करावा लागला. ३४ वर्षांचा पुनीत बिष्टचा जन्म दिल्लीमध्ये झालाय. पुनीत देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिल्लीकडून विकेटकीपर फलंदाजाची भूमिका पार पाडतो. पुनीत २०१२ या वर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडूनही खेळला आहे. रणजी सिझनमध्ये त्याने दुहेरी शतकाच्या बळावर ५०२ धावांचा रतीब घातला होता. २०१८ मध्ये रणजी ट्रॉफीमध्ये त्याने त्याच्या कारकीर्दीमधलं तिहेरी शतकही झळकावलं होतं.

Exit mobile version