Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘टीम वन’च्या वतीने वैद्यकीय उपकरणांचे लोकार्पण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | ‘समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं’ या उद्दात्त भावनेतूनच एलआयसीचे डव्हलपमेंट ऑफिसर विनोद ठोळे यांनी ‘टीमवन’च्या वतीने स्व. पुनमचंदजी चंपालालजी ठोळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जळगावच्या चार प्रतिथयश समाजसेवी संस्थांमार्फत वैद्यकीय उपकरणे समाजासाठी उपलब्ध करून दिली आहे.

 

जळगाव शहरातील टीमवनच्या सभागृहात शनिवारी २९ रोजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांच्या हस्ते रुग्णॊपयोगी साहित्य हस्तांतरित करून लोकार्पण करण्यात आले. रेडक्रॉस, संपर्क फाऊंडेशन, भवरलाल अँड कांताबाई फाऊंडेशन आणि रोटरी क्लब वेस्ट या निवडक चार संस्थांना हे साहित्य देण्यात आले. यावेळी सर्व प्रथम विनोद ठोळे यांनी जिल्हाधिकारी राऊत यांचे तुलासीचे रोप देऊन स्वागत केले. याप्रसंगी डॉ. प्रसन्न रेदासनी, गनी मेमन, सुभाष साखला, डॉ. अपर्णा मकासरे, अनिल शिरसाळे, तुषार तोतला, पुरुषोत्तम न्याती, कृष्णकुमार वाणी, सुनील सुखवानी आणि टीम वनचे सदस्य उपस्थित होते. प्रसंगी सृष्टी लोढाने नवकार मंत्राचे पठण केले. रेडक्रॉस रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्न रेदासनी यांनी सर्व समाजसेवी संस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त केलं. प्रास्ताविक विनोद ठोळे यांनी केले. सामाजिक दायित्व म्हणून ठोळे आणि टीमवन ने सुरू केलेल्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कौतुक केले.
टीम वनच्या वतीने ५ मोठे बेड, ५ लहान बेड, ५ व्हील चेअर, ४० वॉकर, ३० कमोड चेअर आणि २५ स्टिक,१ कॉनसेंट्रेटर (आधार काठी) अश्या १११ घरगुती उपचारासाठी लागणारे वैद्यकीय साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. यातील रेडक्रॉस संस्थेसाठी २ मोठे बेड, ३ लहान बेड, २ व्हील चेअर,२५ वॉकर, १५ कमोड चेअर, १० स्टिक ~ आधार काठी; १ कॉनसेंट्रेटर संपर्क फाऊंडेशनसाठी १ मोठा बेड, १ व्हील चेअर, ५ वॉकर,५ कमोड चेअर, ५ स्टिक ~ आधार काठी; कांताई फाऊंडेशनसाठी १ मोठा बेड, २ लहान बेड, १ व्हील चेअर, ५ वॉकर, ५ कमोड चेअर, ५ स्टिक ~ आधार काठी; रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्टसाठी १ मोठा बेड,१ व्हील चेअर, ५ वॉकर, ५ कमोड चेअर,५ स्टिक ~ आधार काठी असे भरीव साहित्य देण्यात आले आहे.

भाग १

भाग २

भाग ३

 

Exit mobile version