Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी; केंद्र सरकारचा दणका

tiktok app

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभरात चीनविरोधी जनक्षोभ तीव्र झालेला असतांना आज केंद्र सरकारने टिकटॉकसह एकूण ५९ चीनी अ‍ॅप्सवर बंदी लादण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून चीनी अ‍ॅप्सच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून चीनमधील वस्तूंसह चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. यातच टिकटॉक या चीनी अ‍ॅपविरूध्द जनआक्रोश मोठ्या प्रमाणात उफाळून आला होता. भारतीय युजर्सनी टिकटॉकला पुअर रेटींग देऊन त्याला अनइस्टॉल करण्याची मोहीम सुरू केली होती. तथापि, गुगलने हा स्पॅमर्सचा हल्ला असल्याचे सांगून टिकटॉकचे समर्थन करत हे रिव्ह्यूज काढून टाकले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज केंद्र सरकारने टिकटॉकसह अन्य तब्बल ५९ चीनी अ‍ॅप्सवर भारतात बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. यात युसी ब्राऊजर, हॅलो, वुई चॅट, कॅम स्कॅनर, मी कम्युनिटी, शेअरईट, झेंडर आदींसारख्या तुफान लोकप्रिय असणार्‍या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

Exit mobile version