Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टिंगल टवाळी केल्याच्या रागातून बापलेकावर तलवार हल्ला !

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । टिंगल टवाळी केल्याच्या रागातून एकाने हातात तलवार घेवून बापलेकावर वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील चिनावल फाट्यानजीक घडली आहे. याप्रकरणी एकावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सावदा पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, युवराज उर्फ शांताराम सिताराम आढळे (वय-५४) रा. वाघोदा बु ता रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ९ एप्रिल रोजी युवराज हे त्यांचा मुलगा ऋतीक याच्यासोबत चिनावल फाट्याजवळील डी.के. महाजन यांच्या घरानजीक गप्पा मारत असतांना त्याठिकाणी दारूच्या नशेत संशयित इमाम मुबारक तडवी हा तिथे आला. यावेळी टिंगल टवाळी केली. त्यानंतर इमाम हा घरी निघून गेला. थोड्यावेळाने इमाम हा हातात तलवार घेवून दोघाजवळ आला. “थांब शांतराम तू लय मातला आहे, तुला आता पाहतोच” असे बोलून त्याच्यावर तलवारने वार केले. यात कपाळावर आणि हातावर दुखापत केली. तर ऋषीकेश याला मारहाण केली. याप्रकरणी शांताराम आढळे यांनी सावदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली.त्यानुसार संशयित आरोपी इमाम मुबारक तडवी रा. वाघोदा बुद्रुक ता रावेर याच्या विरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version