Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाकळी प्र.चा येथे विवाहितेला ऑनलाईन गंडवले; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | एटीएम पिन तयार करून देतो असे सांगून अज्ञाताने विवाहितेची ऑनलाईन ५० हजार रुपयांची फसवणूक  केल्याची घटना तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे उघडकीला आली आहे. याप्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील वंदना विजय पाटील (वय-४३) या विवाहितेला ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते १२:१५ वाजताच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून (मो. ७८६६९९२३१८) एटीएम पिन तयार करून देतो म्हणून संदेश आला. तेव्हा वंदना विजय पाटील यांच्याकडून बॅंक खात्याची सर्व माहिती घेतली. व ॲनी डेस्क नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून खात्यातुन ४९,९९९ रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. त्यावर वंदना विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-४२० व आयटी ॲक्ट ६६ (सी) प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास स्वत पोलिस निरीक्षक के. के. पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version