Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाकळी प्र.चा येथे तारांच्या उंची वाढविण्याची मागणी

चाळीसगाव, प्रतिनिधी | तालुक्यातील टाकळी प्र.चा येथे वाहतूकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या खांबाला हलवून तारांच्या उंची वाढविण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील प्रभाग क्रमांक 5 मधील काही ठिकाणच्या रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब हे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. त्यामुळे त्यांना रस्त्याच्या बाजूला हलवून तारांच्या उंची वाढविण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे यांनी उपकार्यकरी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर खरजई रस्त्याचे काम सुरू आहेत. या रस्त्याचे उंची जवळपास २ फुटाने वाढल्याने बोरखेडा, न्हावे, ढोमने, बहाळ, वाडे, टेकवाडे, तरवाडे, खरजई या विविध गावातील वाहतुक करणाऱ्या उसाच्या व कपाशीच्या गाड्यांना विजेचे तार अडथळा निर्माण करत आहेत. यामुळे तातडीने सदर तारांची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य भावेश कोठावदे, विजय पाटील, भूषण महाजन व ललित महाजन आदींनी सह्या केल्या आहेत.

Exit mobile version