टाकरखेडा येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयातील एनएसएस राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर १७ ते २३ जानेवारी या कालावधीत दत्तकगाव टाकरखेडा ता.एरंडोल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन सरपंच प्रवीण पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. गौरी राणे ह्या होत्या. तसेच या कार्यक्रमाला डॉ. सचिन नांद्रे, डॉ. मधुलिका सोनवणे आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर हे तरुण-तरुणी यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, असे मत डॉक्टर मधुलिका सोनवणे यांनी व्यक्त केले. तर प्रत्येक सहभागी स्वयंसेवीकेने आपल्या मधील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्याचा उपयोग आपल्या महाविद्यालयाचा, आपल्या विद्यापीठाचा आणि स्वतःचा विकास करण्याकरता करून घ्यावा असे आवाहन डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. तर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य गौरी राणे यांनी विद्यार्थिनींनी सदर शिबिरात विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन विद्यापीठातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा, तसेच स्वतःचीही विशेष काळजी घेऊन शिबिर व्यवस्थित पार पाडावे. आपल्यातील कलागुणांचा विकास करावा असे शिबिरार्थींना आवाहन केले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेवीका दीप्ती पाटील हिने तर आभार प्रदर्शन एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ.दिपक किनगे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. शिला राजपूत, प्रा. आर.एन. महाजन, प्रा. अनिल बेलसरे, प्रा. रंजना पाटील, अजय चौधरी, सी.आर. शिवदे, राहुल झांबरे यांनी परिश्रम घेतले. या शिबिरात महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या एकूण १२५ स्वयंसेवक विद्यार्थिनी, ५ माजी स्वयंसेवीका, ५ कार्यक्रमाधिकारी आणि ३ शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग आहे.

Protected Content