टपरीवर बसण्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भादली खुर्द येथे टपरीजवळ बसल्याच्या कारणावरून एका तरुणासह त्याच्या कुटुंबाला शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुरुवार १६ मार्च रोजी रात्री १० वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

जळगाव तालुका पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सतीश सुखदेव सोनवणे (वय 32, रा. भादली खुर्द ता.जि. जळगाव हा तरुण आई वडील व पत्नी यांच्यासह वास्तव्याला आहे. मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता सतीश सोनवणे हा गावातील शाळेजवळ असलेल्या एका टपरीजवळ बसला होता. या कारणावरून टपरीधारक समाधान एकनाथ कोळी रा. भादली खुर्द ता. जळगाव याने जाब विचारात टपरीवर बसल्याच्या कारणावरून तरुणाला अश्लील शिवीगाळ केली. तसेच तरुणाच्या आई-वडील व पत्नीला शिवीगाळ करून त्याला लाकडे दंडक्याने डोक्यावर व पायावर मारहाण करून दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर तरुणाने गुरुवार १६ मार्च रोजी रात्री १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी समाधान एकनाथ कोळी रा. भादली खुर्द यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पो ना. किरण अगोणे करीत आहे.

Protected Content