Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झोपेत लोटगाडीवरुन पडल्याने प्रौढाचा मृत्यू

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील कांचननगरात झोपेत लोटगाडीवरुन पडल्याने डोक्याला मार लागून प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार, २४ मे रोजी घडली आहे. सुभाष जनार्दन फालक वय ५३ असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

जळगाव शहरातील कांचननगरात सुभाष फालक हे कुटुंबासह वास्तव्यास होते. त्याच्या लोटगाडी होती, बुधवारी सुभाष फालक हे घरासमोर उभ्या असलेल्या त्यांच्या लोटगाडीवर झोपले होते. झोपेत ते लोटगाडीवरुन खाली पडले, डोक्याला मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांना त्यांना मयत घोषित केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप नन्नवरे हे करीत आहेत.

Exit mobile version