Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झारखंड राज्यात शिष्यवृत्ती घोटाळा

रांची : वृत्तसंस्था । झारखंड राज्यातील सहा जिल्ह्यांमधील १५ शाळांमध्ये शिष्यवृत्ती पडताळणीत घोटाळा समोर आला आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाद्वारे मंजुरी मिळालेल्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीबाबत ३० पेक्षा अधिक लाभार्थी विद्यार्थ्यांनी हा खुलासा केला आहे.

मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रांचीच्या हुतूप येथील गॉड चर्च शाळेत ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या जिक्रूल अन्सारी या विद्यार्थ्यानं सांगितलं की, “त्यांला मे महिन्यांत २,७०० रुपये शिष्यवृत्ती मिळाली, जी प्रत्येक वर्षी मिळणाऱ्या ५,७०० रुपयांपेक्षा निम्म्यानं कमी आहे. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिष्यवृत्तीबाबत अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी धक्कादायक उत्तर दिलं. ते म्हणाले, “आम्ही देखील कठोर मेहनत केली आहे, त्यामुळे आम्हाला पण पैसे मिळण्याचा अधिकार आहे. माझे वडील लिफ्ट चालवतात त्यांच्या ८००० रुपये पगारात गुजराण करणे कठीण होते. पण आम्हाला माहिती नव्हतं की जिक्रुलला ५७०० रुपये शिष्यवृत्ती मिळते.”

गॉड चर्चच्या रेकॉर्डनुसार, ४९ विद्यार्थ्यांना १,००० रुपयांपासून १०,७०० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. शाळेचे अध्यक्ष अनिल चकोर यांनी शाळेचे व्यवस्थापक आणि शिक्षकांवर यासंदर्भात फसवणुकीचा आरोप केला आहे. त्याचबरोबर तिलियाटांड, लातेहरच्या अली पब्लिक स्कूलमधील अथिया फिरदौस हिला सहावीच्या वर्गासाठी १०,७०० रुपये मंजूर करण्यात आले. खरतरं अथिया तिसरीच्या वर्गात शिकते आणि ती वसतिगृहातही राहत नाही. तरी देखील तिला शाळेतून ५,३५० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली, पण ती १,००० रुपये शिष्यवृत्तीसाठी पात्र आहे, असं तिच्या कुटुंबियांचं म्हणण आहे.

रोकॉर्डनुसार, १५७ विद्यार्थी ज्यांपैकी ७२ मुली आहेत, त्यांना ही स्कॉलरशिप मंजूर करण्यात आली. या शाळेत विद्यार्थींनीसाठीचे वसतिगृह नाही. शाळा चालवणाऱ्या मौलाना रिजवी यांनी सांगितलं की, सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी एजंट्सच्या माध्यमातून शिष्यवृत्तीसाठी फॉर्म भरले होते. माझं काम होतं की ते माझ्या शाळेत शिकतात की नाही याची पडताळणी करणं. पण घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घुघरीच्या लॉर्ड शाळेमधील रेकॉर्डनुसार, सादिया परवीन इयत्त ७ वीची विद्यार्थीनी आहे. सादिया सांगते की, “तिने कधीही लॉर्ड कृष्णा शाळेत शिक्षण घेतलं नाही. तिने देवेंद्रनाथ शाळेतून दहावी पास केली आहे. शाळेत ३२४ विद्यार्थ्यांपैकी कमीत कमी २१३ विद्यार्थी असे आहेत ज्यांना १०,७९९ रुपये मिळाले आहेत. या शाळेच्या इमारतीत मैदानाच्या मध्यभागी केवळ पाच खोल्या आहेत. शाळेचे मालक संजय गोप म्हणाले, “२०० मुंलांकडून आम्हाला याबाबत निवेदन आलं. यामध्ये बनावट असू शकतात. यामध्ये काहीतरी अवैध झालं आहे मात्र हे कसं झालं याची माहिती नाही.”

रांचीचा मदरसा आलिया अरबमध्ये १०२ विद्यार्थ्यांना १०,७०० रुपयांची शिष्यवृत्तमी मिळाली. त्यामध्ये ४७ वर्षीय रजिया खातून यांचा समावेश आहे. रजिया यांनी सांगितले की, “एका एजंटने आम्हालाा सांगतलं होतं, की तुम्हाला १०,७०० रुपये मिळतील. मला हे माहिती नव्हतं की हा पैसा शाळेच्या मुलांसाठीचा असेल.

रामगढमधील ब्लू बेल्स शाळेत १७९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली गेली. यांपैकी १७६ विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, शाळेत कोणतेही वसतिगृह नाही. रांचीच्या मंदार ब्लॉकमधील बेराटोली येथील ४७ वर्षी गुलशन आरा यांच्या पतीचे २ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांची परिस्थिती बिकट बनली होती, त्यावेळी त्यांच्या एका ओळखीच्या व्यक्तीनं त्यांना सांगितलं की, जर त्यांनी आपल्या आधार आणि बँक खात्याची माहिती दिली तर त्यांना सौदी अरेबियावरुन चॅरिटीचे काही पैसे मिळतील.एप्रिल महिन्यांत तिला १०,७०० रुपये मिळाले पण यांपैकी निम्मे पैसे एजंटनेच घेतले.

धनबाद येथील डुमरामधील डेफोडिल्स पब्लिक स्कूलच्या रजिस्टरनुसार, २२४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती स्विकारण्यात आली. यांपैकी २२२ विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याचे दाखवण्यात आले. या शाळेतही कोणतेही वसतिगृह नाही. इथं पहिली ते आठवीपर्यंत १००० विद्यार्थी आहेत. लाभार्थ्यांमध्ये १२५ किमी दूर हजारीबागमध्ये राहणाऱ्या नईमा खातून यांचाही समावेश आहे.

धनबादच्या कर्नल पब्लिक स्कूलमधील २०५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली. यांपैकी १९८ विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहत असल्याचं दाखवण्यात आलं. रांचीमधील हुतुप येथील गॉड चर्च स्कूलमध्ये ९ वीत शिकणाऱ्या राहुल उरांव या आदिवासी समाजातील मुलाला पारशी समाजाचा दाखवण्यात आलं. त्यानं सांगितलं की, “मला कुठलीही पावती न देताच रोख २,७०० रुपये मिळाले.” या शाळेचे अध्यक्ष फादर अनिल यांनी सांगितलं की ही मोठा घाटाळा आहे.

Exit mobile version