Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झायड्स कॅडीलाच्या विराफीन औषधाला भारतात परवानगी ; ७ दिवसांत कोरोना पेशंट निगेटिव्ह

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । झायड्स कॅडीला  या कंपनीचं  विराफीन  हे औषध कोरोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी भारताच्या औषध  महानियंत्रकांनी   मान्यता दिली आहे.काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे.

 

या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर ७ व्या दिवशी करोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

 

गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशात कोरोनाशी लढा सुरू आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात कोरोनासाठीचं लसीकरण देखील सुरू झालं. मात्र, अजूनही देशात रोज शेकडोंनी रुग्ण मरत आहेत. असं असताना देशासाठी कोरोनाच्या लसींसोबतच अजून एक आशेचा किरण दिसू लागला आहे.

 

 

 

 

झायडसनं जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल ९१.१५ टक्के आहे. अर्थात, हे औषध दिलेल्या बाधितांपैकी ९१.१५ टक्के रुग्णांचे अहवाल हे ७ दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत. विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

विराफीन दिल्यानंतर कोविड रुग्ण वेगाने बरे होण्यास मदत होत असल्याचं देखील कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. रुग्ण लवकर बरे होत असल्यामुळे त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज कमी होते. रुग्णाला रेस्पिरेटरी डिस्ट्रेस देखील कमी होतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

 

रुग्णाला सुरुवातीच्या काळातच विराफीन दिलं, तर कोरोना विषाणूचा प्रभाव लक्षणीयरीत्या कमी होतो. यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. अतिशय महत्त्वाच्या काळात हे औषध भारतात आलं असून आम्ही  या लढ्यामध्ये त्याच्या मदतीने रुग्णांना साथ देऊ”, असं कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले आहेत.

Exit mobile version