Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

झाडांना पाणी देताना शॉक लागून एकाचा मृत्यू

 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हॉटेल जवळील झाडांना पाणी देताना वायरला स्पर्श झाल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत आधिक माहीत अशी की, स्वप्नील मच्छीन्द्र पाटील वय २७ रा टाकरखेडा ता.अमळनेर हा सकाळी साडे अकरा वाजता टाकरखेडा अमळनेर रस्त्यावर गट नंबर १९४ व १९५ मधील शेतात असलेल्या नाश्त्याच्या हॉटेलच्या आवारात झाडांना पाणी देत असताना पाण्याच्या मोटरच्या कट झालेल्या वायरवर पाय पडल्याने त्याला शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शव विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल कपिल पाटील करीत आहेत.

Exit mobile version