झन्ना मन्ना जुगार अड्ड्यावर धाड – पाच जणांना अटक

पाचोरा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नगरदेवळा परिसरात झन्ना मन्ना जुगार खेळत असतांना नगरदेवळा दुरक्षेत्र पोलिसांनी धाड टाकुन ५ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून एक पत्त्यांचा कॅट व १ हजार ९०० रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे.

तालुक्यातील नगरदेवळा ते शिंदोळ रोडवरील घनश्याम गोंधळी यांचे शेताजवळ अग्नावती नदी काठाजवळ काहीजण झन्ना मन्ना जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती नगरदेवळा दुरक्षेत्र पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांच्या एका पथकाने दि. २२ जुन रोजी रात्री घटनास्थळी धाड टाकत घटनास्थळावरून रविंद्र रमेश कोळी, जय राजेंद्र पवार, शरद हिरामण भोई, दिपक उर्फ विजय रामा कोळी व सुरेश लालचंद कुऱ्हाडे (सर्व रा. नगरदेवळा ता. पाचोरा) यांना ताब्यात घेत त्यांचेकडुन १ हजार ९०० रुपये व एक पत्त्यांचा कॅट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. प्रकाश संतोष पाटील हे करीत आहे.

Protected Content