ज्वेलर्स दुकानातून ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले

भडगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथील  महावीर ज्वेलर्स दुकानातून ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी  चोरून नेले. याप्रकरणी रविवारी २१ मे रोजी रात्री ९ वाजता भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील महावीर ज्वेलर्स दुकान आहे. हे दुकान निलेश सुभाष जैन यांच्या मालकीचे आहे. २० मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दुकान सुरू असताना अज्ञात व्यक्तीने नजर चुकून ड्रावरमध्ये ठेवलेले १५ हजार रुपये किमतीची सोन्याचे रिंगा आणि सोन्याची पोत असा एकूण ६५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर दुकानदार निलेश जैन यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नरेंद्र विसपुते करीत आहे.

Protected Content