Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ज्याला मेसेज येणार त्याला मिळणार कोरोनाची लस-राजेश टोपे

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोना लसीकरणाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असंही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

“१८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायची आहे त्यासंबंधीचा मेसेज संबंधित व्यक्तीला येईल तो येणार, त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार अशा प्रकारचं मायक्रो प्लानिंग सुरु असल्या”चं टोपे यांनी सांगितलं.

” लस केंद्र सरकार पुरवेल अशी आम्हाला खात्री आहे. जी कामं राज्य सरकारने करायची आहेत ती आम्ही करतो आहोत. लॉजिस्टिक, डेटा या सगळ्याची कामं सुरु आहेत. लसीकरणाच्या परिमाणाबाबत एक युनिट तयार करण्यात आलं आहे. सीरम आणि भारत बायोटेक यांनी लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. आता निर्णय केंद्राला करायचा आहे” असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

 

Exit mobile version